वचनबद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा कोणत्याही निरोगी नात्याचा मूलभूत पाया असतो; ते नाते कुटुंबातील सदस्य, मित्र, कार्यालयातील सहकारी किंवा कंपनीचे आपल्या ग्राहकांशीही असू शकते. म्हणूनच सर्व नात्यांनी ‘सरळ शब्दात’ व्यक्त होणे आवश्यक असते.
‘सरळ शब्दांत’ किंवा ‘सरळ चर्चा’ हा एक विचार आहे, ज्यामुळे नात्यांमध्ये प्रामाणिक आणि थेट संभाषण होते.
आयआयएफएल फायनान्सच्या सहकार्याने स्टोरी मिरर सादर करत आहे #सरळ शब्दात - वचनबद्धता, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नात्यांचे मोल ‘सरळ शब्दांत’ व्यक्त होण्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा या स्पर्धेचा हेतू आहे.
नियम :
#सरळ शब्दांत संदेश देणारी कथा, कविता किंवा कोट लिहा.
आपल्या रचनेमध्ये आणि टॅगमध्ये #सरळ शब्दांत हा हॅशटॅग वापरा
शैलीचे कोणतेही बंधन नाही.
सहभागींनी आपली मूळ रचना सादर करावी.
सादर केल्या जाणार्या कथा, कविता किंवा कोट्सच्या संख्येला मर्यादा नाही.
शब्दमर्यादा नाही.
संपादकीय गुण आणि मिळालेल्या मतांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
प्रकार :
कथा
कविता
कोट
भाषा :
इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली.
बक्षिसे :
शीर्ष विजेत्यांना आयआयएफएल फायनान्स मर्चंडाईझदेखील प्राप्त होईल, ज्यात तुमचा आवडता क्रिकेट सुपरस्टार रोहित शर्मा आहे! अधिक माहितीसाठी बक्षिसे हा विभाग पाहा.
शीर्ष 3 विजेत्यांना डिजिटल प्रशस्तीपत्र मिळतील आणि स्टोरी मिरर फिक्शन रायटिंग कोर्समध्ये (Foundation course - http://sm-s.in/hiTr31d) विनामूल्य प्रवेश मिळेल.
प्रत्येक भाषा आणि रचना प्रकारातील शीर्ष 20 विजेत्यांचे साहित्य ई-बुक म्हणून प्रकाशित केले जाईल.
सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र आणि रु. 100 किंमतीचे स्टोरी मिरर शॉप व्हाऊचर मिळेल.
पात्रता :
रचना सादर करण्याचा कालावधी - 24 सप्टेंबर, 2020 (00 वाजून 1 मिनिटे) ते 20 ऑक्टोबर, 2020 (23 वाजून 59 मिनिटे) भारतीय प्रमाणवेळेनुसार.
मतदानाचा कालावधी - 25 ऑक्टोबर, 2020 ते 15 नोव्हेंबर 2020.