नवरात्री नऊ रूपे
नवरात्री नऊ रूपे
ओटी भरण्याची प्रथा
देवी माता ही पावती
भरा आहे दंतकथा
चोळी नारळ व खन
म्हणतात भरतात
कुंकू हळद कापूर
फुले प्रसाद ताटात
धूप बत्ती उदबत्ती
मनोभावे तिची पूजा
भक्ती हेच शक्ती जाणा
अर्थ नाही त्यास तुजा
चला आपण हर्षाने
भरा एकविरा ओटी
तीच साथ ही देईल
येता संकट ही खोटी
लेण सौभाग्याचा आहे
सर्व एकमेका देती
सुखी ठेवी कुंकवाला
मात्र एवढं म्हणती.