Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime


4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime


बेरोजगारी

बेरोजगारी

1 min 181 1 min 181

शिकण्यात गेले अर्धे आयुष्य

शिकून करावे काय...

शेवटी नशिबी बेरोजगारी

जीवन वायाच हे जाय.


आईबाप म्हातारे, बिचारे

थकले राबूनी जीवनभर,

ऐतखाऊ मी बेरोजगार

झालो आहे भुईला भार.


नोकरीचा पत्ता नाही

कमाई कसली मुळीच नाही,

वय लग्नाच संपून गेलं

पोरगीच कोणी देत नाही.


आली लग्नाला बहीण ही

डोंगर कर्जाचा लई ,

बाप मागतो मरण रोज

आईच्या डोळ्यात पाणी येई.


जगतोय जीनं केविलवाणं

खिसा फाटका नशीब हे काय,

कळेना जगावं का मरावं

बेरोजगारी शापच हाय.


काढतोय मार्ग ठेवून हिंमत

जीद्द जगण्याची मनात धरून,

बेरोजगारीवर करतोय मात

कुक्कुट,वराह, बकरी पालन करून.


बेरोजगारांनो घ्या वसा

हिंमत मर्दा नको हरु,

लाज कसली रे कष्टाला

बेरोजगारीवर मात करू.


Rate this content
Log in

More marathi poem from " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Similar marathi poem from Horror