कोरोना..
कोरोना..
कोरोना पसरत नाही
तो पसरविला जातोय,
माणूसच माणसाचा
उगीच जीव घेतोय.
कोरोना पसरविला
दिल्ली तून गल्लीत,
माकडाच्या हाती
जनु दिलंय कोलीत.
कोरोनाचा का पसरवणाऱ्या चा
करावा बंदोबस्त,
श्र्वास झाला बंद
जनता सारी त्रस्त.
शासन करतंय बिचारं
सर्वतोपरी उपाय,
खेकडावृती बळावतेय
धरुन ओढते पाय.
शून्याचा कोरोना आकडा
गेला हजारोंच्या घरात,
झाला नाही फायदा
वाजवून ही परात...
सगळीकडे झाला या
कोरोनाचा हाहाकार,
जनता बसली बघत
करतंय काय सरकार..
बंद काय,चालू काय
काहीच नाही मेळ,
दिल्लीत झाला खेळ
वाईट आली वेळ...
अजून थोडा वेळ आहे
उशीरा लक्षात येईल,
कोरोना पसरवणारे संपले
तरच कोरोना संपून जाईल..!