केरळ कहाणी
केरळ कहाणी
केरळ कहाणी "पुष्पाग्रज"
आभाळ फाटलय,
धोधो बरसतय,
वाहून जातय सार,
पाणीच पाणी, जिवघेणी,
केवढा हा महापूर!
आस्मानी संकट हे
कसं ऊठलय जिवावर,
केवढा हा जलप्रलय
झाला केवढा हाहाकार!
जलमय झाले,वाहून गेले
झाली जिवाची हानी,
बेघर बेसहार सारे,
ना अन्न ना पाणी!
पाण्यातच गाव,घरे
कित्येक वाहून गेले,
जिवनात झाला अंधार सारा,
पाणीच पाणी झाले!
महापूर पाहुनी वाहे
डोळयातून महापूर,
संपर्क तुटला जगाचा ही
ना गाव ना घर!
निसर्ग हा कोपला,
घेतला कित्येक बळी,
ह्रदय फाटले केवढा
तो अक्रोश ती किंकाळी!
निसर्गाने ही केवढी मोठी
केली बरबादी,
गेल सार,सारच काही,
सारं पाण्यामधी!
देव होऊनी लष्कर आले
मदतिस धाऊनी,
अंन्न,पाणी पुरविले
वाचविले जीव त्यांनी!
मानवतेन चला सारे
मदतीस जाऊ धाऊनी,
डोळ्यास लागती धारा ऐकूण, पाहून केरळ कहाणी..!
गायकवाड आर.जी.दापकेकर
