"समज"
"समज"
त्या त्या वयात ते ते, चूकही नसते काही
त्या त्या वयात ते ते, उमजतेच ऐसे नाही..
दूरस्थातील दीप दिसतातच ऐसे नाही
स्वप्नांच्या वाटांमागे, लपलेले काहीबाही..
सुखवतात डोळ्यांना, कोमल किरण रवीचे
पण माध्यान्हीचा सूर्य, समजतोच ऐसे नाही.
कुणी पाणीदार नेत्रांनी, करते मनास स्पर्श
पण त्यांपुढचा अंधार, समजतोच ऐसे नाही..
तळव्यांना मृदूल भासे, झुळझुळते पाणी केव्हां
पण डोहामधले गूढ, उकलतेच ऐसे नाही.