आस पावसाची
आस पावसाची
डहाळीचा झुला
आभाळी पोचला
ढगांच्या डफाला
शिवून परतला
पावसाची बोली
चातक तोली
विहिरी खोल
हरवून ओल
काठावर झाले
मौन बोल
आस लावून
मोर फसला
पोझ घेऊन
पाय दुखला
माती कळवळली
विरह दाटला
तहान पीत
पाऊस बसला.
