STORYMIRROR

Kaustubh Wadate

Abstract

0.6  

Kaustubh Wadate

Abstract

तर बरं झालं असतं

तर बरं झालं असतं

1 min
27.5K


कहाण्यांचे कितीतरी किस्से असेच पुटपुटतो मी,

कोणीतरी ऎकायला असतं तर बरं झालं असतं.

कधीकधी भिंतींशीही खूप गप्पा मारतो मी,

कोणीतरी बोलायला असतं तर बरं झालं असतं.

शब्दांनी विणलेलं.. अर्थांच जाळं.. कागदावर कोरतो मी,

कोणीतरी वाचायला असतं तर बरं झालं असतं.

प्रशस्त असा महालोंचा महाल बांधतो मी,

कोणीतरी रहायला असतं तर बरं झालं असतं.

भिका-यासारखे देवाकडे उगाच सोबती मागतो मी,

कोणीतरी द्यायला असतं तर बरं झालं असतं..

फक्त श्वासांच्या आधारावर आता जगतो मी,

कोणीतरी संपवायला असतं तर बरं झालं असतं..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract