मेहंदी तुझ्या हातावरची
मेहंदी तुझ्या हातावरची
हातावरती मेहंदी किती शोभून दिसते छान ।
पाहत बसता तिला विसरून जाते भान ।।
लग्न समारंभाची आहे प्रथा मेहंदीची ।
कुतूहल वाटे सर्वाना तिच्या लाल रंगाची ।।
हाताची शान वाढवते ती मेहंदी ।
ज्याच्या हातावर असते ती व्यक्ती आनंदी ।।
मेहंदी झाली आहे फॅशन आत्ताच्या युगाची ।
मात्र ही गोष्ट आहे फार फार वर्षाची ।।
सजावी नेहमी हातावर नक्षीदार मेहंदी ।
सगळ्याचे जीवन देवा बनू दे आनंदी ।।