पर्यावरण वाचवा
पर्यावरण वाचवा
1 min
994
उन्हाळा पावसाळा अनं हिवाळा आहे सृष्टीचं चक्र ।
बदलून गेलं आहे सार पर्यावरणाच हे चित्र ।।
कारणीभूत आहे याला मानवी हिंसक वृत्ती ।
बदलून टाकली माणसानं माझी सुंदर ही पृथ्वी ।।
वृक्षतोड करून याने सारी जंगले केली साफ ।
सांगशील का रे माणसा कुठं फेडशील हे पाप ।।
असाच वागत राहिलास तर सृष्टी नष्ट करशील ।
गरमी अनं प्रदूषणाच्या ओझ्याखाली मरशील ।।
पर्यावरण वाचव तुझा जीवही वाचेल ।
पृथ्वीवरती साऱ्या सुख समृद्धी ही नांदेल ।।
