STORYMIRROR

Girish Bhadwalkar

Others

4  

Girish Bhadwalkar

Others

बदलती परिस्थिती

बदलती परिस्थिती

1 min
27.6K


जीवनामध्ये मानवाने खूप काही कमावलं ।

माणुसकी कमी झाली यातच सर्व गमावलं ।।

  पूर्वी होती आपुलकी राग मात्र न्हवता ।

  माणूस तेव्हा एकमेकांना जोडलेला होता ।।

बदलत्या युगात आज माणूसही बदलत चालला ।

प्रेम कमी होऊन दुरावा वाढत गेला ।।

  विज्ञानाच्या जोरावर खूप शोध लावले ।

  माणसं मात्र माणसाप्रमाणे जगणंच विसरले ।।

एक उचकीवरती कुणीतरी काढतसे आठवण ।

हेच होती माणसाच्या मानाचे मोठेपण ।।

  परिस्थिती कशी पहा आज बदलत चालली ।    

बदलत चालला माणूस कुठे प्रगती झाली ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन