STORYMIRROR

Girish Bhadwalkar

Romance

3  

Girish Bhadwalkar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
26.8K


शब्द आहे खूप छोटा भावना खूप मोठी ।

अडीच अक्षरी प्रेमाने बनतात अनेक नाती ।।

  प्रेमाचे अनेक प्रकार येत असतात समोर ।

  जसं आईच नी बाळाचं प्रेम असतं अमर ।।

दोन जीवांचं मिलन होते प्रेमाच्या या धाग्यात ।

सुख-दुःखाचे मणी गुंफती पती-पत्नी त्यात ।।

 

  प्रियकर-प्रियसी दोघांची असे सुंदर जोडी ।

  कसे असेल भविष्य याची भीती थोडी थोडी ।।

जीवनामध्ये सर्वांनाच खरे प्रेम मिळत नाही ।

ज्यांना मिळते खरे प्रेम ज्यांच्या असते ते नशिबी ।।

  प्रेम म्हणजे काय ? प्रेम कस असावं ?

  हे जाणून घेण्या प्रेमात लागत पडावं ।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance