STORYMIRROR

Trupti Naware

Romance

4  

Trupti Naware

Romance

मला भिजायचेय श्रावणात

मला भिजायचेय श्रावणात

1 min
41.3K


ग्रीष्माची अलवार फुंकर तू..

 झाडांवरचं हिरव गोंदण तू..

 मृदगंधाच्या अत्तराचा शिडकाव तू..

 अवनीच्या सुर्यास्ताचा शृंगार तू..

 मेघांवरचं इंद्रधनुष्याचं लेपण तू..

 अमृतवर्षावाचा श्रावण तू..

 स्वतः गातोस तू,रंग भरतोस तू..

 मला भिजायचेय श्रावणात शब्दांनी 

 शब्द सुगंधी ओलावले..

 मग का मला अडवतोस तू ?

 आकाशाच्या प्रेमात तू..गवताच्या फुलात तू..

 शिरव्यात पडणाऱ्या उन्हात तू..

कधी बोलतोस तू,कधी रडतोस तू..

मला भिजायचेय श्रावणात शब्दांनी 

शब्द ओलावले थेंबानी...

 मग का हसतोस तू..?

 पानावरच्या दवात तू..

 आनंदाच्या पालवीत तू..

 विजेच्या कातर निनादात तू..

मला भिजायचेय श्रावणात शब्दांनी 

शब्द च भिजले पानावर

ओघळणार्या अश्रूंनी

मग कां वाटेत तुझ्या मी ?

माझ्या तर सदैव डोळ्यात तू !

माझ्या तर सदैव डोळ्यात तू !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance