STORYMIRROR

Trupti Naware

Abstract Romance Fantasy

3  

Trupti Naware

Abstract Romance Fantasy

तो तिथे...

तो तिथे...

1 min
487

तो तिथे....

डोळ्यातून आग ओकत

लालबुंद होवून

माझ्याकडे रोखून पाहतो

मी इथे...

भिंतीला टेकून 

विचारात मग्न

गंभीर होवून

त्याच्याकडे एकटक पाहते

त्याच्या प्रखर किरणांतुन निघणारे

धारदार प्रकाशाचे वार

प्रत्येकजण साहतो

मला मात्र तो मावळतीचा

क्षितीजासोबतचा खुप आवडतो  

लालकेशरी आकाशघरातला तर

तो राजकुमार शोभतो

म्हणुनच की काय

कधी कधी मलाही

सप्तरंगी पंख लेवून

परी व्हावसं वाटतं 

पण हळुहळू समुद्राच्या लाटा

गिळून संपवतात त्याला 

राहुन गेले ओंजळीतच

जे सांगायचे होते मला

तो तिथे....

अस्तास गेलेला 

कातरवेळ भेट देवून

काळोखात लपून हसतो

मी इथे....

पहाटवाटेत सताड डोळ्यात

चंद्र साठवून ..

तो येईल पुन्हा ....म्हणून 

रात्रभर जागते

तो येईल पुन्हा ...म्हणून

रात्रभर जागते !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract