पिंपळपान
पिंपळपान


सळसळ पिंपळपानाची
रात्रीला ऐकू यावी रात्रीने ऐकण्यासाठी
वाऱ्यास आर्जवे करावी
गंधाळलेली विनंती आपसूक सर्वदूर पसरावी
हलकेच एका पानाने
शरणागती पायाशी घ्यावी
स्पर्श जरी केला तरी वाऱ्याने
मध्यस्थी करावी....
कसा करावा पाठलाग
त्याने खेचून मिठी मारावी
हा इतका उनाड का होतो
झळ वाफाळलेली द्यावी
कधी इतका लबाड होतो
ओंजळीत सावली चंद्राची यावी
काजव्याची कुजबूज होती की
वाऱ्याने गायली गाणी
झाकलेल्या पापणीवरती
त्याने पुन्हा नजर फिरवावी
पिंपळपान रात्रीचे होते
तळमळ या जीवाची का व्हावी???