स्वर बासरीचा ..!!!!
स्वर बासरीचा ..!!!!


झाली ऐकून ती व्याकूळ
निनादणारी बासरी .. ..
घातले पालथे तिने गोकुळ
तो हसत होता अंतरी ..
तिच्या भासात कृष्ण होता
तिच्या श्वासात होता कृष्ण
त्याच्या नसण्याचा कधीकधी
तिला कळत नव्हता अर्थ
कधी राधेचे असणे होते
कधी कृष्णाचे नसणे होते
असण्यापरी नसणे त्याचे
उदास मेघ हसत होते ..
ती वेणुत गुरफटली होती
वेणुला तो राधा समजत होता
गोकुळ व्याकूळ होत होते
बासरीचा स्वर मध्यस्थी होता .