शब्द
शब्द
निःशब्दाची असतात शब्द
पिंगा घालतात मनाभोवती वेडी
गुंग करतात मती
थांबवतात गती विचारांची ||
मनाचे अंकुर फुलवतात शब्द
आपण मात्र निश्चित भाववेडी
घडवती क्रांती
आपुल्या हाती स्वप्नांची ||
मैत्रीच्या धाग्यात बंधतात शब्द
विश्वासाच्या जोडीला सौख्यवेडी
रागारागात खेळती
क्षणक्षण मोजती आयुष्याची ||
