STORYMIRROR

Pandit Warade

Abstract

3.7  

Pandit Warade

Abstract

लळा कवितेचा

लळा कवितेचा

1 min
41.6K


लळा कवितेचा


या कवितेने वेड लाविले

लळा लावला जिवा शिवा

काय करावे, कसे करावे?

काही सुचेना माझ्या जिवा..१


संसाराचा भार उचलता

जीव कसा वैतागून जातो

या कवितेच्या सहवासाने

सहज जीव हा सुखावतो....२


कुणी प्रेयसी संगे असता

फुल प्रीतीचे फुलून येते

शब्द न् शब्द जुळून येती

मनात कविता अंकुरते.......३


थेंब मृगाच्या पावसाचा

मातीवर जेव्हा पडतो

सुगंध काळ्या मातीचा

कवितेमधुनी दरवळतो......४


फुलपाखरू बनून येते

आकाशामध्ये भिरभिरते

ध्यानी, मनी, स्वप्नामध्ये

कविता सदैव घुटमळते.....५


जिथे तिथे कविता दिसते

अवघे जग तिने व्यापियले

दुःखाला सारुनिया मागे

सौख्य जीवनी आणीयले...६


पंडित वराडे, 

औरंगाबाद

०२.०८.२०१८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract