निर्माता तू या विश्वाचा
निर्माता तू या विश्वाचा


निर्माता तू या विश्वाचा
तुझ्याविना ना जगात काही
तुझ्यामुळेच सृष्टी चालते
तुजविन पानही हलत नाही
पशु पक्षी झाडे वेली
सूर्य चंद्र अन् ग्रह तारे
तूच निर्मितोस सृष्टीवर
थंडी पाऊस वादळ वारे
नदी, नाले, झरे, नि ओहोळ
पाणी तयांचे वाहे खळखळ
मुक्त नभांगणी पक्षी विहरती
गीत खुशीचे गात मंजुळ
सारे काही जिथल्या तिथे
जेव्हाचे तेव्हा,जसेच्या तसे
सारी व्यवस्था तूच पाहतो
तूच सर्वांच्या ठायी बसे
तुझी सुंदर निर्मिती मानव
उपकार तुझे विसरून जातो
तुझ्या मदतीने मिळवतो
गूण मात्र स्वतःचे गातो
तुझ्या चरणी ही एक विनंती
सद्बुद्धी दे तुझ्या मुलाला
स्मरण तुझे सदोदित राहो
विसरणार ना निर्मात्याला