झाड
झाड
किती सोशिक असतं झाड
सार काही सामावून घ्यायची
सहन करायची शक्ती असते त्याला...
तरीहि इतरांना आनंद देतं झाड
पतझडीच्या पानगळीचं रुप बघण्यासारखं....
श्रावणसरी नंतरच बहरलेलं,,हिरवंगार
मखमलीसारखं...
पक्ष्यांच्या निवार्याच घरटंही त्याच्यात
वाटसरुंना थंडगार सावलीही त्याच्यात
त्याच्यातच असते फळांची रास
त्याच्यातच सुगंधी फुलांची बाग
उन,वारा,पाऊस,थंडी सारं काही सोसतो..
तरीसुद्धा अबोल असुन खुप काही बोलतो..
त्याच्या मुळात आहे अटल खंबीरता
फांद्यामधुनच दिसते आधाराची क्षमता
ओघळणार्या थेंबाने ...त्याचं दुःख सावरल
त्याला रडावसं वाटतंय पण..
अश्रुंनाही त्याने गोठवलं...
त्याने दिलीय प्रेरणा
जगण्याची नवी उमेद
त्याच्याकडेच बघून
जगायचे लागलेत वेध..!!