कळलंच नाही आम्हाला कधी आम्ही
कळलंच नाही आम्हाला कधी आम्ही
कळलंच नाही आम्हाला कधी आम्ही
खायला काळ नि भुईला भार झालो...
यंत्रयुगात स्वतःच एक यंत्रमानव झालो
घड्याळाच्या काट्यावर नाचणारं बाहुलं झालो ...
मातीची घरं गेली अन सिमेंटची जंगलं आली
शेणमातीन सारवलेली घरं कालबाह्य झाली
घराचं घरपणही गेलं अन चुलीचं सरपण ओलं
कळलंच नाही आम्हाला आम्ही कधी मॉंडर्न झालो ..
पेनच्या जागी मोबाईल आलं , सारं काही बदललं खरं ...
इतके कसे आम्ही निलाजरे ? दिवा विझवून वाढदिवस साजरे
आई - बाबा आता मॉम - डॅड झाले, दादा केंव्हाच झाला ब्रो...
p>
पाश्चात्यांच अंधानुकरण ? अहो चे आरे कुठून आलं ?
पूर्वी घरात चार पिढ्या सुखानं नांदायाच्या ,
आता आम्ही मॉडर्न झालो हम दो हमारे दो
बाबानों ! कालानुरूप बदललं पाहिजे खरंय ना ?
खोटं - खोटं का होईना पण मॉंडर्न बना ...
लहानग मुलं आता पाळणाघरात , थकलेले आईबाबा वृद्धाश्रमात
गुलामीत का होईना पण खुर्ची सांभाळा , बरं आपली बायको अन मुलंबाळं
सभोवताली वाट्टेल ते घडो आपल्याला काय त्याचं ? नाकासमोर बघत गपगुमान चालणं...
खरंच गड्यानो ! कळलंच नाही आम्हाला केंव्हा नि कसे आम्ही इतके आत्मकेंद्रित झालो ...