हक्क (कविता)
हक्क (कविता)
साऱ्याच गर्भाना
हक्क आहे जन्मण्याचा
मातृत्वातील वतनवारसा
धारित्रीवरती कोरण्याचा
जन्म असो चाळीत वा असो झोपडीत
जन्म असो उघडयावरती वा बंगल्यात
पण प्रत्येक गर्भाला हक्क आहे
एक मूल म्हणून जन्मण्याचा
मुलगा असो वा मुलगी असो
गर्भ असो पोटातील रक्तामांसातील
त्याच्यासाठी तिष्ठत असतो
एक एक क्षण मातेचा
गर्भामध्ये जागत असतो निर्धार
एक मूल म्हणून जन्मण्याचा
दिमाखानं दिसण्याचा
अन कर्तृत्ववानं फुलण्याचा
पण गर्भाचा हक्क आता
हिरावला जातोय जन्मण्याचं
मातृत्वातील वतन वारसा
धारित्रीवरती कोरण्याचा
आता केलं जातंय गर्भजल परीक्षण
परीक्षणात दिसताच मुलगी
केलं जातंय हो गर्भपतन
गर्भपतन------- गर्भपतन