अरुण दाते
अरुण दाते
स्वरगंगेच्या काठावरती असे अचानक उदासवाणे
वाटू लागले कसे हरवले दातेंचे ते अवीट गाणे
दिवस तुझे हे फुलायचे अन तसेच नेहमी वाटत होते
झुलता झुलता कसे विसरले गाणे मन जे गात होते
किती खेळलो अंगणी आम्ही सवंगड्याना सोबती घेऊन
भातुकली ती अर्ध्यावरती गेले डाव हा अर्धा मांडून
स्वर कधी चुकलाच नाही चुकले मात्र अंदाज थोडे
कायम तरुण समजत होतो पण तेही थकले होते थोडे
डोळे होते कशासाठी स्वप्नात गुंतून जाणे होते
सोबतीला प्रेमळ मैत्र दातेंचे ते गाणे होते
अविरत ओठी रामहि होता भक्तिमय ते जगणे होते
हृदयातूनि ओठांवर खुलले दातेंचे ते गाणे होते
आता मागे तरीही उरले बरेच गाऊन असे सोडले
मी ते झोळीत भरू लागलो अरुण अस्त झाला जेथे
तरुणाईत अनेक मैफिली खरेच किती मजा घेतली
एक अश्रू येई न सांगता वाट आता धूसर झाली...
अजूनही येते गुंजत आहे दातेंचे ते अवीट गाणे
सूर खणखणीत सांगतात बघ असे दाते न पुन्हा होणे