घरटे
घरटे
1 min
21.6K
सुगरणीचे घरटेअप्रतिम नमुना कलेचा
एकएका काडीने धागा विणते जीवनाचा
इवल्याश्या पिलासाठी खोपा बांधला झाडाला
सान पिलासाठी जीव झाडाला टांगला
स्वप्न भविष्याचे पाहे सुखी असावे लेकरं
लेकरांच्या भविष्यासाठी काळजी करी कष्ट फार
इवलासा जीव कसाकाडी काडी जमवते
उभ्या आयुष्यासाठी सुंदर घरटे विणत राहते
कलाकृती निर्मितीसाठीअखंड मेहनतीची जोड असावी कल्पकता,
परिश्रमकरून आयुष्य सुंदर जगण्याची ओढ असावी