STORYMIRROR

Suchita Kulkarni

Romance

4  

Suchita Kulkarni

Romance

अजून सारे तसेच आहे

अजून सारे तसेच आहे

1 min
500

मंद धुंद हे वारे वाहती

मनात माझ्या सुगंध आहे

मोरपिशी ते प्रेम मनाचे

अजून सारे तसेच आहे


होता स्पर्श तलम रेशीमी

मनी काहूर अधीर आहे

भेट तुझी अन माझी व्हावी

अजून सारे तसेच आहे


उंच डोंगरी माळावरती

रेशीम गाठी बांधून आहे

किती घेतल्या त्या आणाभाका

वचन सारे तसेच आहे


नदीकिनारी झाडावरती

नाव तुझे अन माझे आहे

बहर फुलांचा मळ्यातला

अजून सारे तसेच आहे


वाट पाहुनी शिणले डोळे

मनात माझ्या छबीच आहे

विरह मनाचा नको आता

मनात माझ्या झुरत आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance