स्वातंत्र्य
स्वातंत्र्य


दिन स्वातंत्र्याचा येता
हर्ष दाटला मनात
उफळली देशभक्ती
बहरली रे हृदयात
जोश होता कर्तृत्वाचा
देशप्रेम होते मनी
लढा होता स्वातंत्र्याचा
ध्येय एकचि जीवनी
कित्येकांनी केला त्याग
दिली प्राणांची आहुती
देश स्वतंत्र होताना
झाली आतुर धरती
ध्वज फडके गगनी
हर्ष उल्हास जीवनी
प्राणाहून प्रिय असे
गाऊ स्वातंत्र्याची गाणी
होती पहाट प्रसन्न
नवी दिशा उगवली
गेले मळभ संपून
नवी आशा पल्लवली
माता आनंदित होती
पाहे तेजाची पहाट
स्वप्न उराशी धरता
चालू स्वातंत्र्याची वाट
शिरी शोभतो मुकुट
उभा तोऱ्यात नागेश
ध्वज फडकता नभी
धुंद झालाय आकाश
ढोल ताशा हो वाजला
रंग शिंग हो फुंकले
हर्ष होता मनोमनी
देशा स्वातंत्र्य मिळाले