गणेशा
गणेशा
1 min
133
येता गणेश
आनंदोत्सव करी
आनंद उरी
सडा रांगोळी
मखर सजवूया
फेर धरुया
ढोल ताशाचा
नाद घुमतो दारी
आनंदसरी
गणेश पूजा
मनी भक्ती भावना
करू साधना
करू आरती
पंचखाद्य नैवद्य
देव आराध्य
सुख संपदा
विघ्नहर्ता गणेश
तेज प्रकाश
दुर्वांकुर ती
आवडे गणेशाला
हर्ष जाहला
पंचखाद्य ते
मोदक नैवेद्याला
गणपतीला
तो बुद्धीदाता
विघ्नहर्ता गणेशा
दाखवी दिशा
जास्वंदी फुल
लंबोदरास भावे
नवस पावे
