STORYMIRROR

Suchita Kulkarni

Children Stories

3  

Suchita Kulkarni

Children Stories

एकीचे बळ

एकीचे बळ

1 min
168

एक होत जंगल जंगल होत छान

जंंगलामध्ये राहायचे प्राणी मोठे ,लहान

तळ्याकाठी जाऊन भागवायचे तहान

पशु, पक्षी आनंदानं करायची गुजरान

एकदा काय झालं ?

भला मोठा हत्ती आलाझुलवत सोंड

मीच म्हणे राजा नाही मला तोड

म्हणा मला राजा तुम्ही सारी प्रजा

नाहीतर मी देईन भली मोठी सजा

झाडे, वेली उखडुन प्राण्यांना देई त्रास

आनंद वाटायचा त्यास त्रास देणे खास

सर्व पशु पक्षी मिळून विनंती त्यास करायची

हात जोडून सर्व प्राणी भीक त्यास मागायची

नको नको हत्ती दादा नको जीव घेऊ

किती देतोस त्रास उगीच नको मस्तीत राहुस

मग काय सारे प्राणी विचार करू लागले

कसा धडा शिकवावा चर्चा करू लागले

झाडाखाली होते वारूळ मुंग्यांचे हो छान

एकजुटीने राहायच्या होत्या भारीच महान

ठरवलं मग मनोमनी शिकवू त्यास धडा

कसे राहायचे जीवनामध्ये। देऊ त्यास पाढा

मस्तीत होता हत्ती गर्व होता फार

एवढी शी मुंगी माझं काय करणार?

मुंग्यांनी केली भलतीच कमाल

कडकडून चावा घेत केले बेहाल

हत्ती लागे पळायला मोठयाने रडायला

एवढा मोठा हत्ती मग लागला मुंगीला घाबरायला

एकीच्या बळाने संकट होते दूर

कमी नका समजू कोणाला आम्ही सारे शूर


Rate this content
Log in