STORYMIRROR

Suchita Kulkarni

Romance

3  

Suchita Kulkarni

Romance

प्रेम माझे गीत झाले

प्रेम माझे गीत झाले

1 min
337

मनमोर झाले प्रिया

पावसात भिजताना

चिंब चिंब तनमनी

तूझी साथ असताना


हात तुझा माझ्या हाती

धुंद पावसात न्हाऊ

मोरपंखी प्रेम माझे

मोरपिशी स्वप्न पाहू


मनमोर चित्तचोर

भावनांना घाली साद 

सुख माझ्या जीवनी तू

तूच माझा प्राण नाथ


धुंद झाल्या भावना त्या

लाली चढली हो गाली

अधरांची मूक बोली

कशी मनाला कळाली


भाव माझे गीत माझे

मेघ मल्हार गायले

प्रेम सरी बरसल्या

आठवात मी नाहले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance