आधार
आधार
1 min
20.9K
बेचैन मन शोधते
एखादा क्षण प्रेमाचा
क्षण आठवतो तो
तुला दिला वचनाचा
काढतो मागोवा मग
मला न मिळाल्या आधाराचा
तेव्हा हृदयाला आधार असतो
फक्त तुझ्या आठवणींचा
भेटीस तुझ्या विलंब
होत नाही कशाचा
मिलनास तुझ्या
द्रवतो पर्वत प्रितिचा
जेव्हा आरोप असतो
माझ्यावर या जगाचा
तेव्हा हृदयाला आधार असतो
फक्त तुझ्या प्रेमाचा
प्रत्येक क्षण घालविला
तुझ्यासोबत सुखाचा
समोर असतो सदा
तुझा चेहरा आनंदाचा
तुझ्या विना असतो
प्रत्येक क्षण दुःखाचा
तेव्हा हृदयाला आधार असतो
फक्त तुझ्या विरहाचा