योगा योग
योगा योग


जुळले प्रेम नात्यांचा योग आला
फुलत गेले प्रेम नातंही खुललं
तरी प्रारब्ध शाप देवुन गेला
तुटलं प्रेम नातंही संपलं मन मेलं
सुखे भिन्न ही दुख्ख सारखे
प्रित प्रारब्ध ही अशी कशी
कोण पोसेल ही प्रित पोरकी
अंतराळी नाते मी जपु कशी
वेदनेचा एक हुंकार उमटतो
मन जाळतो क्षण वेचिते
आठवांशी रमतो व्याकुळतो
दृष्ट माझीच प्रितीस लागते
हाच योगायोग जीवनी दिसे
असुनी माझे सर्व माझे नसे
तळमळणे वाट पाहणे प्रारब्ध
हाती काहीच नसे मी माझी नसे