इशारा
इशारा
तसं तुला रोजरोज भेटणं तर शक्य नाही पण
पापण्यांना सुखावा तुझ्या सावलीतही मिळेल
शब्दाशब्दांतून बोलणं कधीकधी सोयीचं नसतंही पण
तुझ्या मौनातही मला अंतरीचा ठाव कळेल
चर्चा करणारे चर्चा इवल्याशा इशारयावरचीही करतील रे ,
दुनियेची रीत मोडशील तर गाडी पुढे निघेल
दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे !
त्यात तुझं नाव काढल्यावर लाजणारी मीही एक असेल.