पायवाट
पायवाट
पायवाट जुनीच पण
बदलल्यात जराश्या खुणा
थांबावे का चालावे
विचार येतोय मनात पुनः पुन्हा।
सुरुवातीची सोबत आता
जाणवत नाही अजिबात
ठेच लागते सारखी
तीही देत नाही आधी सारखी साथ।
भर उन्हात कधीतरी
थांबली होती वाट माझी पाहत
सावली बनून रहायची ती
सोडत न्हवती कधी माझा हात।
आता चालताना पावलोपावली
शोधतो मी माझाच सहारा
घामाच्या धारेलाही भुलवणारा
आज हताश होऊन बसलाय थंड वारा।
जरासा अंधार झाला म्हणून
मी एकटाच प्रकाश होतो शोधत
माहीत न्हवते हे सारे
ती होती लांबून बघत।
फिरताना हताश होऊन माघारी
भेटली पुन्हा नव्याने त्याच वळणावर
तीच काळजी,तेच प्रेम भावले मला
म्हणून थांबणार आहे त्याच वळणावर
त्याच वळणावर....