Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Shreyas Gawde

Romance


3.1  

Shreyas Gawde

Romance


“ तू आणि मी, अशी फक्त कल्पना

“ तू आणि मी, अशी फक्त कल्पना

1 min 16.2K 1 min 16.2K

“ तू आणि मी, अशी फक्त कल्पना असावी ”

 

तू आणि मी, अशी फक्त कल्पना असावी ;

सोनेरी त्या क्षणाला, “ एकांताची ” साथ असावी . . .


गुलमोहराचा सर्वत्र बहर, आणि तिथेच आपली भेट घडावी ;

जसे एखाद्या फुलपाखराची, गोड ड्रीम डेट असावी . . .


तू मात्र माझ्या आवडत्या, आकाशी रंगाच्या पोशाखात असावी ;

आकाशालाही मग हेवा वाटावा, इतकी तू सुंदर दिसावी . . .तेव्हाचं अचानक नभ दाटून यावे, त्यात माझी राधा चिंब भिजावी ;

त्या रिमझिम पाऊसात, अश्या प्रेमगंधात, नवचैतन्याची उमेद असावी. . .


तू आणि मी सतत तासनतास बोलावे, अशी मनी इच्छा धरावी ;

इच्छेलाही मार्ग सापडावा, अश्या नात्याची जोड दोघांत दिसावी. . .  


रंगलेल्या त्या गप्पांमध्ये, दरवेळी प्रेमाची पण ओढ असावी ;

एकमेकात गुंतून जाताना, परतीची मात्र तमा नसावी . . .निरोप घेताना डोळ्यांमध्ये, अश्रुची एक झलक दिसावी ;

डोळ्यांमधले भाव जाणुनी, नाजुकशी ती मिठी असावी . . .


जीव ओतला हृदयी तुझिया ठाई, आशा हीच तुझी सुद्धा असावी ;

एकांताची साथ अशी ही, बहरत दरवेळी रम्य असावी . . .


प्रेमाच्या पवित्र धाग्यात, तू साताजन्माची सोबती राहावी ;

प्रेम हेच गीत, प्रेम हीच प्रीत, अशीच प्रेमाची निराळी रीत असावी. . .

  

तू आणि मी ही फक्त ‘कल्पना’ नसुन ती ‘सत्यात’ असावी . . .

आयुष्यभर त्या सोनेरी क्षणाला, “ एकमेकांची ” साथ असावी . . .Rate this content
Log in

More marathi poem from Shreyas Gawde

Similar marathi poem from Romance