STORYMIRROR

Shreyas Gawde

Romance

3  

Shreyas Gawde

Romance

सहप्रवासी

सहप्रवासी

1 min
174

तुझं नि माझं कसं जुळलं माहितीय ... ?


ऐन गर्दीत तू चौथी सीट होऊन बाजूला आलीस . .

पुढे माझ्या प्रवासाची सहप्रवासी झालीस . .

सोबत घातलेला हा घाट असाच सुरु राहिला..

आणि मग माझ्या बाजूची विंडो सीट झालीस ....


प्रवास अगदी सुखावह होता. .

ट्रेन च्या धकधक आवाजाने मोह वाढत होता. . 

नवीन प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली...

आणि माझ्या विचारांची ओढ होऊ झालीस...


प्रवासाने आता वेग धरला होता. .

स्टेशन स्थानका प्रमाणे विचारही जुळला होता...

प्रवासातील गट्टी कुठल्याश्या छोटयाशा ओळखीने घट्ट मैत्रीत रूपांतर झाली. .

अन कुठल्याश्या ऐन लोकल गर्दीत तू माझी एक्सप्रेस झालीस...


आता एक्सप्रेस च्या आवाजात सुद्धा श्वास ऐकू येत होते. .

नंबर च्या एक्सचेंज प्रमाणे सूत ही जोडले होते...

खंत फक्त शेवटच्या तिच्या क्षणांची (स्टेशनची) झाली ...

आणि माझी आपली ट्रेन शेवटच्या स्थानकात येऊन थांबली...


आता आधीचा नकोसा प्रवास सुद्धा गोड हवाहवासा वाटत होता. .

मुंबई लोकलच्या बोर्ड प्रमाणे प्रवास डोळ्यासमोरून धावत होता...

उतरताना जड होणारे पाय धाय मोकलून रडत होते..

आणि पुन्हा तुझ्या सोबत उलटा प्रवास सुरु कर सांगत होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance