STORYMIRROR

Shreyas Gawde

Romance

3  

Shreyas Gawde

Romance

कशी आहेस ना तू

कशी आहेस ना तू

2 mins
245


कशी आहे ना तू . . .

ना धड बोलत नाहीस आणि बोललीस तर फक्त तेवढ्यापुरतीच . . .

आपल्या दोघांतील हे उपवासाचे क्षण, भूक लागली तरी मिटत नाही. . .

आणि तुला रोज मेसेज पिंग केल्याशिवाय मला काहीच जमत नाही. . .


कशी आहेस ना तू. . .

आज तुझा दिवसभर नव्हता ना कॉल, ना एखादा मेसेज. . .

मग, माझं मीचं ठरवलं होतं धरूया थोडा अबोला. . .

पण, तुझा मेसेज पाहता माझा जीव आईस्क्रिम सारखा क्षणात वितळला. . .


कशी आहेस ना तू. . .

न बोलून प्रेमाला खिंडार पाडतेस, अन जास्त बोलून वादाला . . .

मग दुसऱ्या क्षणी रागात बघून हक्काच्या प्रेमाची पालवी उमलवतेस. . .

तेव्हा वेडा माझा जीव फक्त तुझ्या अबोल्याच्या आनंदात ओघळला. . .


कशी आहेस ना तू. . .

कधी कधी वाटतं नुसतं कामापूर्तीच बोलतेस, त्यावेळेस पक्की खडूस वाटतेस. . .

>

दुसऱ्या क्षणी इतकी बडबड करतेस की मला परत माझीच वाटतेस. . .

हे बदलणारे तुझे मूड स्विंग मला तू असण्याची चाहूल देऊन पुन्हा नॉर्मल करतात. . .


कशी आहेस ना तू

माझ्या सुखात वेळेला कधीच हजर नसतेस तू; तेव्हा रागाने माझी परिसीमा गाठलेली असते. . .

मात्र कठीण प्रसंगात नेहमी मदतीला धावून येतेस; त्यावेळी मी पुरता संभ्रमात पडतो . . .

दुःखात बुडालेला मी, तुझ्यात नव्याने, पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो. . .


खरं सांगू मला वाटतं,

अशीच आहेस तू . . .

तुझं प्रेमना माझ्या जेवणातल्या मिठासारखं आहे. . .

पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर जेवणचं जात नाही. . .

आता मला कळलं मनापासून ते हृदयापर्यंत तू कशी आवडतेस. . ? तर तू आहेस तशी आवडतेस. . . {अळणी}


कशी आहेस ना तू . . .

     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance