कला
कला
एखादी अनपेक्षित कला !
हवी जर का तुला शिकाया. .
झिजवावे, बुडवावे लागेल तुझेच तन-मन-ध्यान;
लीन होऊनि लक्ष गाठाया. . .
कष्टाचीच सारी महती,
नसे काही नशीबावरती. .
अवघड अश्या कलेला ;
तुझ्या कर्तृत्वाची चं महती . . .
भरकटलेले रस्ते कैक,
सत्याचा बिंदू मात्र एक. .
तरंगात कृष्ण-विवरच्या ;
अपेक्षांचीच ओजी वाढती. . .
एक नाद , एक साद,
विश्वाच्या खोल डोहात. .
तुझ्या कलेस पूजतील ते सर्व;
ज्याच्या साठी होतास कधी-काळी नाममात्र. . .
असाच लौकिक क्रम प्राप्त कर,
जमिनीवर पाय रोवून. .
नसे कशाची भीती मुळीच,
ज्याच्या कलेची नाळ अतूट !