काळीज
काळीज


घरी टाकून माया लहानग्याले
जातो जवा कवा कामाधंद्याले
कायीज माया लयी फाटते
जवा हंबरडा फोडते माया मांग येवाले ।।
धसकास भरते माया उरामंधी
एकट्याला घरी सोडून जातांना
काळयजात माया हूरहूर दाटतीया
जवळ तो माया नसतांना ।।
हातपाय हलकी,डोए पानावली
ओढ कायजाले चिरू चिरू पाही
तिकं भूकेचा टाहो फोडाला की,
इकं दुधाचा पान्हा धारेन वाही ।।
माया अंगाखांद्यावर लोळतं रोज
माया कायजाचा तुकडाच हाय
काबाळकष्ट हा त्याच्यासाठी चाली
त्याच्याशिवा माये जगणे नाय ।।
आनंदाला पारा नसे तवा
जवा *माय*ही हाक कानी लागी
पाहताच मले इवल्या डोयांंनी
लळत,धावत माया अंगाला बिलगी ।।