STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
251

परंपरा ही रक्षणा बहिणीच्या,

रक्षाबंधन हा सण प्रेमळ संस्कृतीचा.

भाऊ-बहिण अतुट नात नवलाईचा.

मनामनात प्रेमाची ज्योत रोषणाईचा.


पहिली राखी अर्पिली सद्गुरुना,

मग अर्पिली सर्व देव देवताना.

एक राखी सर्व सैनिकांस स्मरण,

मागणे मागते,कर सदैव रक्षण.


भारतीय संस्कृतीचा सण,

औक्षणाचे असे प्रमुख स्थान.

तबकी घेऊन सुमन ज्योत.

रेशमीबंधात वाढत राहू दे प्रित.


प्रत्येक सैनिकास,अन भावास,

मागणे मागते करून औक्षण देवास.

आम्हा सर्वांच्या पाठीशी राहून,

सदैव कर आमचे व देशाचे रक्षण.


रंक्षाबंधन माहेरवाशिणीचा भेटीचा,

सासर, माहेर मिलन गाठीचा.

स्वतःच्या हाताने मिठाई भरवत

उजळणी बालपणातील आठवणीचा.


 वेळच नाही कुणास ही आज,

जो तो धावतोय नोकरी पाठी.

नात्यात प्रितीचा सुगंध दरवळण्यास,

सण रक्षाबंधन, आठवण देण्यासाठी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational