STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

2.5  

UMA PATIL

Inspirational

अंधारत्या सावल्या.....

अंधारत्या सावल्या.....

1 min
41.1K



लेक आणि आई, दोघी

हाती घेऊन खुरपे

शिवारात पाटलाच्या

कापे गवत, झुडपे.....(१)



जरी कल्पना चावला

घेई कवेत आकाश

गरीबांच्या नशीबात

सारा झाकला प्रकाश.....(२)



काम करता - करता

आई गेली दूर - दूर

माय दिसेना लेकीला

डोळ्यांतून वाहे पूर.....(३)



उभा तिथे अनोळखी

झेपावला लेकीवर

हात लावला दुष्टाने

तिच्या त्या शरीरावर......(४)



आई दिसल्यानंतर

आईकडे झेपावली

लेक तिच्या खांद्यावर

अलगद पहुडली.....(५)



असा दुष्ट नराधम

कुठे जाऊन दडला ?

त्याचे छाटेल मुंडके

जर वैरी सापडला ?.....(६)



त्याला शोधून - काढून

धडा आज शिकवेल

हातातल्या खुरप्याने

मान कापून काढेल.....(७)



हाती घेऊन खुरपे

झपाझप पावलांनी

आई मागते प्रकाश

अंधारत्या सावल्यांनी.....(८)



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational