थँक्यू टीचर
थँक्यू टीचर


'शिक्षक दिनीच' का शिक्षकाची
सर्वांना येते आठवण
ज्ञान घेण्या गुरुकडेच का
होते प्रत्येकाची पाठवण
कारण जन्मदात्या बापानंतर
हाच खरा फादर असतो
त्यासाठीच 'थँक्यू टीचर'
हा प्रत्येक तोंडी आदर दिसतो
वही अन् पेनासारख़ं
गुरु शिष्याचं नातं असतं
प्रत्येकाचं आपल्या गुरुकडे
एक अदृश्य खातं असतं
कितीही ज्ञान हया खात्यातून काढा
कधीच होत नाही कमी
जगातल्या कुठल्याच बँकेत
मिळणार नाही अशी हमी
शिष्य मोठा झाल्यावरही
हे खातं ओपन दिसतं
कारण गुरुच्या ज्ञानाचं
इथं रोपण असतं
ज्ञानाशिवाय होत नाही खरी प्रगती
करण्या आपुली प्रगती
रोज घालावी शिक्षकांना साद
शिक्षक दिनाशिवायही गुरुला
द्यावा रोज धन्यवाद !