Ajay Bagul

Tragedy


4.1  

Ajay Bagul

Tragedy


वेडं मन

वेडं मन

1 min 244 1 min 244

उतारवयात शक्ती कमी होत जाते

पण जगण्याची आसक्ती वाढत राहते

अनुभवांची शिदोरी असूनही

जगण्याची कला जमत नाही

सारं काही सोबत असतांनाही 

वेडं मन कुठंच रमत नाही

छोट्या छोट्या गोष्टींवरून मन हट्टी होत जातं

आपल्याच माणसांशी लहान बाळासारखं कट्टी घेत राहतं

ज्या पाळण्यात स्वतः झुळलो त्यात नातवाला झुलवतो

मनाच्या व्हरांड्याटच मग स्वप्नांची बाग फुलवतो 

हे माझं ते माझं म्हणत आयुष्य पुढे सरकत असतं

आपल्या माणसांमध्ये राहूनही वेडं मन भरकटत बसतं

फिरण्याची इच्छा असते पण पाऊलं डगमग्णारी असतात 

पिंजऱ्यातील जीव केव्हा निघेल याची वाट पाहत बसतात.


Rate this content
Log in

More marathi poem from Ajay Bagul

Similar marathi poem from Tragedy