STORYMIRROR

kishor zote

Inspirational Tragedy

3.2  

kishor zote

Inspirational Tragedy

कुठवर सहन करायच

कुठवर सहन करायच

1 min
41.5K


स्वतःचा पैसा खर्च करून

पोरांना वही पेन्सिल दयायची

जिल्हा परिषद शाळा काय

फक्त गुरूजींनी चालवायची?

समाज सहभाग मिळवून

शाळा डिजीटल करायची

पुन्हा बदली आदेश हातात

अंमलबजावणी निर्णयाची

घर, समाज, उदासीन तरी

शिदोरी दयावी संस्काराची

गुणवत्ता नाही म्हणत

ओरड उगाच करायची

साफ सफाई खिचडी वाटप

सारे कामे गुरुजींनी करायची

ऑनलाईन माहिती भरून

स्वखर्चे झेरॉक्स काढायची

षडयंत्र चाललेय आता

शिक्षण द्वारे बंद करण्याची

हे कुठवर सहन करायच

वेळ आलेय एकत्र लढण्याची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational