यश (अभंग)
यश (अभंग)


यश अपयश । येतेच जीवनी ।
जातो हुरूळुनी । यशानेच ॥ १ ॥
अपयश नको । प्रत्येकास वाटे ।
गुलाबाला काटे । नको तेच ॥ २ ॥
यशवंत व्हावे । आशिर्वाद देता ।
नमन करता । मनोभावे ॥ ३ ॥
यशाची ती चव । चाखावी वाटते ।
हृदयी ती दाटते । सांगावेसे ॥ ४ ॥
किशोर पाहतो । यशाची शिखरे ।
तेथेच निखारे । राखेतील ॥ ५ ॥