STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Drama Tragedy

4  

Deepali Thete-Rao

Drama Tragedy

लिमीटेड आनंद

लिमीटेड आनंद

1 min
192

मी खुल्या नभाखाली जगते, मी मोकळ्या अगंणी फिरते

तरीही समाधानी न मी, मी लिमिटेड आनंदातच जगते....


घ्यावया भाजी निघते, नोट शंभराची हळूच पाकीटात दडवते

रूपयास्तव घासाघीस करते, मी लिमिटेड आनंदातच जगते.....


खरेदीस म्हणूनी निघते मी, रंग-ढंग आवडीचा शोधते

परी मन हे किंमतीवरती झूलते, मी लिमिटेड आनंदातच जगते.......


दमूनी हॉटेलमध्ये जाते, हळूच पदार्थांचे दर पाहते

अन पोट तेवढे भरण्या स्वादानंदाला मूकते, मी लिमिटेड आनंदातच जगते.........


रस्त्यापलीकडे उभी जीवाची सखी माझी, मी घड्याळ पाहून लांबूनच अच्छा करते

वेळेच्या काट्यावर मी मैत्रीच की हो पणाला लावते, मी लिमिटेड आनंदातच जगते........


मी समारंभाला जरी जाते, हळूच बोलते-हसते,

मँनर्सच्या नादात एखादी दिलखुलास दाद द्याया कचरते, मी लिमिटेड आनंदातच जगते.........


प्रत्येक ठिकाणी मोल स्वत:चे लावते, निर्मितीच्या आनंदाला पैशामधे तोलते

बुद्धीस माझ्या विकून मी चाकोरीतच फिरते, मी लिमिटेड आनंदातच जगते..........


जाणवले हे जेव्हा मी दचकूनी स्वत:स सावरले, जेथे पहावे तेथे माझेच प्रतिबिंब दिसते

एकलीच नाही या वाटेवर मी उपहासाने हसते ,

मी लिमिटेड आनंदातच जगते.......

मी लिमिटेड आनंदातच जगते........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama