कवितेचं शीर्षक : पावसा रे
कवितेचं शीर्षक : पावसा रे
पावसा रे पावसा
पावसा रे पावसा
नको घालूस धिंगाणा,
रिमझिम रिमझिम
जुन्याच सरीतला नवा बहाणा
घरावरची छप्परे उडवी
मुजोर हा वारा,
कोरड्या अंत:करणातला
ओला देह सारा
येई तू भेटीस
रोमरोम फुलवित,
डोयातील स्वप्नं
हिंदोळ्यासम झुलवित
शेतकऱ्यांच्या मनातील
फुलवी गोड स्वप्नं,
शीतल करी
दाहकलेली,तापलेली मनं
कवयित्री,
मयुरी कदम.