आयुष्य
आयुष्य
1 min
11.3K
दळता दळण आयुष्याचे
सांज भेटाया आली,
कुठुनी गेला वारा
वाट कळेनाशी झाली.
सुखातून मज गवसले
आनंदाचे मोती,
दु:खात होरपळूनी
झाली खंबीर छाती.
किनारी यशाच्या
ईर्ष्या मज दिसली,
नैराश्येच्या डोहात
कोरडी सांत्वने वसली.
सापशिडीच्या खेळात
कधी सोंगटीच हरवली,
मनातूनी स्पर्धा
मी माझ्याशी बांधली.