निसर्ग
निसर्ग

1 min

11.8K
नभ दाटूनी आले
आसमंत अवखळ डोले,
थवा पाखरांचा
धवल रंगी गुंफले
गुंफले रंगात रंग
रंगूनी एकचि जाहले,
एकतेची नक्षी पाहुनी
रविराज गाली
Advertisement
हासले
हासले पान,फूल
सावळे घन वर्षावले,
धरतीच्या देहावरी
नक्षत्रांचे मोती वाहिले
वाहिले गारांचा चुरा
इंद्रधनु डोकावले,
विविध रंगांच्या छटातुनी
सर्वधर्मसमभाव दाविले.