STORYMIRROR

Mayuri Kadam

Others

3  

Mayuri Kadam

Others

रात्र

रात्र

1 min
12K

चंदेरी पायल नेसून

आली ती अंधारी रात्र

तिची काया जरी काळी, काळी

ती म्हणते,

दिवे लावा विजेचे, संवादाचे, हृदय फुलण्याचे,

कारण अंधार पसरत चाललाय क्षणोक्षणी


रवी प्रकाश जरी तेजाचा, उत्साहाचा, अज्ञान दूर करण्याचा असला तरी तो निर्माण

होण्यासाठी रातीला हळूहळू काळवंडून घेऊन भयाणतेचं रुप

घ्यावंच लागतं


रातीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश असला तरी, दिव्यांची रोषणाई, झगझगाट हे नेत्रसुख दिवसा मिळत नाही,

ताजमहल, सुवर्ण मंदिर दिवसा

खुलत नाही


याच अंधाऱ्या रातीतून आपला चंदामामा आपल्याबरोबर प्रवास करीत असतो,

शीतल सुखद चांदण्यांचा वर्षाव करतो


काहीजण शीतल सुखद चांदण्यांच्या वर्षावात न्हाऊन जातात

तर काहीजण या गोड सुखाला मुकून आयुष्यात अंधार निर्माण

करणारी कामे करत असतात


चंद्र हसतो गालातल्या गालात,

रात्रही हसते त्याच्या जोडीला

काय करावे काय करावे बरे?

माणसाला तल्लख मेंदू आहे ना

आपण तर फक्त रोजच्या रात्रीचे

पाहुणे,

रोजच्या रात्रीचे पाहुणे


Rate this content
Log in