STORYMIRROR

Mayuri Kadam

Tragedy Others

3  

Mayuri Kadam

Tragedy Others

हरवलाय ' प ' प्रेमाचा.

हरवलाय ' प ' प्रेमाचा.

1 min
242

प्रतिस्पर्ध्याला जिंकण्याचं

माध्यम असा,

मनाला फक्त जाणवणारा

पण अदृश्य जसा

हरवलाय 'प' प्रेमाचा.


ज्याला नसतं बंधन

पण असतं फक्त स्पंदन,

गोड गोड शब्द पेरुन

मनाला देणारं अलवार गुंजन

असा हरवलाय 'प' प्रेमाचा.


मैत्रीचा,परस्पर संवादाचा

ज्यात असतो ओलावा,

सारं जग व्यापून दूर

करणारा नात्यातला दुरावा

असा हरवलाय 'प' प्रेमाचा.


मनाला उभारी देणारा,

प्रेरणा देणारा

माझ्यासाठी कोणीतरी झुरतंय

जाणवून देणारा

असा हरवलाय 'प' प्रेमाचा.


फुलपाखरासारखा हातून सुटून जाणारा

पण ठेवून जाणारा बोटांवर रंग,

आजच्या तरुण पिढीने मात्र

केलाय त्याच्या रंगाचा बेरंग

असा हरवलाय 'प' प्रेमाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy